शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

Kolhapur: प्राध्यापिकेच्या फसवणूकप्रकरणी पिंपरी चिंचवडचा संशयित ताब्यात, ४२ लाख खात्यावर वर्ग; चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:42 IST

डोंगरे यांनी भरलेल्या १० बँक खात्यांमधील रक्कम पुढे १३० खात्यांमध्ये वर्ग

कोल्हापूर : सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे (वय ७५, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांना ३ कोटी ५७ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले. डोंगरे यांनी भरलेली ४२ लाखांची रक्कम पिंपरी चिंचवड येथील ३२ वर्षीय तरुणाच्या बँक खात्यात जमा झाली होती. हे खाते नेमके कोण चालवत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांच्याकडून ३ कोटी ५७ लाख रुपये उकळले. यातील ४२ लाखांची रक्कम जमा झालेल्या खातेधारकाचा शोध घेण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आले. संबंधित खाते पिंपरी चिंचवड येथील तरुणाच्या नावे आहे. पोलिसांचे पथक रविवारी सकाळी त्याला घेऊन कोल्हापुरात आले. त्याच्या खात्यावर जमा झालेली रक्कम ऑनलाइन पद्धतीने पुढे वेगवेगळ्या ७० खात्यांमध्ये वर्ग झाली आहे. ही रक्कम त्याने वळवली की अन्य कोणी वळवली याची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तरुणावर यापूर्वी अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.१३० खात्यांची तपासणीडोंगरे यांनी भरलेल्या १० बँक खात्यांमधील रक्कम पुढे १३० खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे दिसत आहे. या खात्यांचा वापर कधीपासून सुरू आहे? खातेदार कोण आहेत? खात्यांवर किती रकमांचे व्यवहार झाले आहेत? खात्यांच्या केवायसी झाल्या आहेत काय? याची तपासणी सुरू आहे. संशयास्पद व्यवहार असलेली बँक खाती गोठवण्याबद्दल बँकांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस