शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव, कोल्हापूर शहरात पाऱ्याने २८ अंशांचा टप्पा गाठला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:06 IST

कोल्हापूर : जून, जुलै महिन्यात दमदार आगमन केल्यानंतर ‘सुट्टीवर’ गेलेला पाऊस परतत नसल्याने कोल्हापूरकरांना ऐन पावसाळ्यात ऑगस्टच्या अधिक महिन्यात ...

कोल्हापूर: जून, जुलै महिन्यात दमदार आगमन केल्यानंतर ‘सुट्टीवर’ गेलेला पाऊस परतत नसल्याने कोल्हापूरकरांना ऐन पावसाळ्यात ऑगस्टच्या अधिक महिन्यात जादाचा ‘उन्हाळा’ सहन करावा लागत आहे. पावसाचा अभाव आणि हवेतील बाष्पाचे अतिरिक्त प्रमाण यामुळे उकाडा कमालीचा वाढला आहे. काल, गुरुवारी काेल्हापूर शहरात पाऱ्याने २८ अंशांचा टप्पा गाठला. पावसाळ्यात २१ अंश सेल्सियस तापमान असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऱ्याने २८ अंशांची पातळी गाठली आहे. यामुळे बाहेर पडणाऱ्या नोकरदार महिला, नागरिकांना स्कार्फ, छत्री आणि टोपीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नद्याचे पाणी पात्राबाहेर गेल्याने अनेक वाहतूक मार्ग बंद झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 5.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर राधानगरी धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदीवरील - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी  व तेरवाड. कासारी नदीवरील - यवलूज असे 7 बंधारे पाण्याखाली आहेत.पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.10 फूट, सुर्वे 19.3 फूट, रुई 45 फूट, इचलकरंजी 42.6, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 31.3 फूट व राजापूर 16  फूट अशी आहे.

जिल्ह्यातील धरण पाणीसाठाधरणांचे नाव, आजचा पाणीसाठा आणि एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्येराधानगरी - 8.17 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.68 (3.471 टी. एम. सी), वारणा 29.56  (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 20.99 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.63 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.43 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 3.39 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.29 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.89 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.48 (1.560), जांबरे 0.81 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ  1.24 (1.240 टी. एम. सी ),  कोदे ल.पा. 0.21 (0.214 टी. एम. सी )

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी हातकणंगले- 0.3 मिमी, शिरोळ - 0.1 मिमी, पन्हाळा- 0.6, शाहूवाडी- 1.4 मिमी, राधानगरी- 0.7 मिमी, गगनबावडा-5.1 मिमी, करवीर- 0.3 मिमी, कागल- 0.4 मिमी, गडहिंग्लज- निरंक मिमी, भुदरगड- 3.2 मिमी,  आजरा-0.3 मिमी, चंदगड- 0.3  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसTemperatureतापमान