शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- भरधाव कारची झाडाला धडक, धामोडमधील तरुण ठार; सौंदत्तीनजीक झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 17:10 IST

कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार झाडावर आदळल्याने भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. धामोड येथील मोटार मेकॅनिक अजित चंद्रकांत धनवडे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. तर, तिघेजण गंभीर जखमी झाले. कर्नाटकात ट्रॅक्टर खरेदीसाठी गेले असता परताना मुनवळी नरगुंद मार्गावर आज, शुक्रवारी सकाळी पहाटे हा अपघात घडला. घटनेची नोंद सौंदती पोलीस ठाण्यात झाली आहे.

उमेश शिवाजी मराठे (वय ३९), कारचालक संतोष सुरज सोनवणे (४० दोघेही राहणार धामोड, ता. राधानगरी) व दत्तात्रय लक्ष्मण बरगे (४०) हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सौंदती सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अधिक माहिती अशी की, कारचालक संतोष सोनवणे हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कोपळ येथे आपल्या कारमधून गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर (रा. केळोशी, खुर्द पैकी कानकेकरवाडी) यांच्यासह मित्र उमेश, दत्तात्रय व अजित या चौघांना घेऊन गेले होते. ते ट्रॅक्टर खरेदी करून आपल्या मूळगावी परतत असताना सौंदत्तीपासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या नरगुंद मार्गावर आतमटी गावाजवळ चालक संतोष यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारची झाडाला धडक बसली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. यात अजित याच्या छातीवर जोराचा मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर तिघे जखमी झाले.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रामदुर्ग सर्कलचे डीएसपी रामनगौडा हटी, सीपीआय जे करणेशगौडा, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन कारच्या मागे असलेल्या ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर यांच्याकरवी अपघातातील जखमी व मृत व्यक्तीची ओळख पटवून कुटुंबियांना संपर्क साधला. मृत अजित यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. या अपघाताचा पुढील तपास सीपीआय जे. करूणेशगौडा करत आहेत.  घटनेमुळे धामोड गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यूbelgaonबेळगाव