शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘वंचित’ला धक्का, अस्लम सय्यद यांनी हाती घेतली मशाल; 'हातकणंगले'त सेनेची ताकद वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 17:24 IST

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नेते हाजी अस्लम सय्यद यांनी मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

अस्लम सय्यद यांनी २०१९ ची हातकणंगले लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यांनी तब्बल एक लाख २५ हजार मते घेतली होती. त्यावेळी सय्यद यांची जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली होती.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारो मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत व शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. आपणही प्रवेश केल्याचे सय्यद यांनी सांगितले. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आसिफ सौदागर, संतोष शिंदे, मोहसीन मुल्लानी, फिरोझ महात, यासीन पठाण, साकिद पठाण, आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार मंडलिक, माने यांना भाजप चिन्हावर लढण्यास सांगतिलं जाणार की भाजपचा स्वतंत्र उमेदवार असणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, हाजी अस्लम सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. तर, निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टीसह विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabhaलोकसभा