शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीत शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून, चार संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:48 IST

निपाणी : शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार निपाणी शहराबाहेरील संभाजीनगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. साकिब ...

निपाणी : शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार निपाणी शहराबाहेरील संभाजीनगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. साकिब समीर पठाण (१४) रा. संभाजीनगर असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते.या घटनेची अधिक माहिती अशी, पठाण कुटुंबीय हे जुने संभाजीनगर येथे किरायाच्या घरात वास्तव्यास आहेत. खून झालेला साकिब हा आठवी इयतेमध्ये शिकत होता. गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता तो घराबाहेर पडला होता. रात्री उशिराही तो घराकडे परतला नाही. दरम्यान, शक्रवारी सकाळी त्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळूमामानगर येथे होत असलेल्या नवीन घराच्या बाजूस त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच साकिब याची आई, वडील समीर, लहान भाऊ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी साकिब रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले.दरम्यान, घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुलेद, चिकोडीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे रमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खून झालेला परिसर सील करून पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत साकिबची आई सिमरन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. त्याचबरोबर चार संशयितांना ताब्यात घेऊन तपासही सुरू केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस