शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा शाळकरी मुलगा बेशुद्धावस्थेत, नेमके कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:45 IST

डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत

पाचगाव (कोल्हापूर): मराठा कॉलनी पाचगाव येथे राहणाऱ्या आठवीत शिकणाऱ्या अभिषेक दिलीप करंजे याने काल, शुक्रवारी पन्हाळागडावरील अंधार बाव टेकडीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नेमकी माहिती मिळाली नाही.शुक्रवारी सकाळी अभिषेक एन.सी.सी साठी शाळेत जाऊन आला. त्यानंतर शाळेला जातो म्हणून दफ्तर घेवून गेला. परंतु तो एस.टी ने थेट पन्हाळगडावर पोहोचला. याठिकाणी त्याने अंधारबाव परिसरातील तटबंदीवरुन उडी मारली. सुदैवाने तो स्मशानभूमीच्या शेडवर पडल्याने त्याचा जीव वाचला. पण त्याला जबर दुखापत झाली असून तो बेशुद्धावस्थेत आहे.शाळेची वेळ झाल्यानंतरही अभिषेक घरी आला नाही म्हणून आईने शोधाशोध केली. परंतू त्याचा काही पत्ता लागला नाही. तोपर्यंत रात्री नऊच्या सुमारास पन्हाळा पोलिसांचा फोन आला आणि अभिषेक पन्हाळगड येथे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला सी.पी.आर येथे दाखल करून तेथून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मूळचे सांगलीचे असणारे दिलीप करंजे हे आपल्या कुटुंबासमवेत मराठा कॉलनी पाचगाव येथे गेल्या आठ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ते सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. अभिषेक हा आठवीच्या वर्गात शिकत असून अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व अभ्यासात देखील हुशार आहे. त्याने चित्रपट व मालिकेमध्ये देखील काम केले असून त्याला अभिनयाची आवड आहे. परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? असा प्रश्न नातेवाईकांसह शेजाऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी