परशुराम जयंतीनिमित्त कोल्हापुरात सकल ब्राह्मण समाजातर्फे शोभायात्रा
By समीर देशपांडे | Updated: April 22, 2023 18:56 IST2023-04-22T18:48:10+5:302023-04-22T18:56:51+5:30
कोल्हापूर : पंचवीसहून अधिक ब्राह्मण संघटनांनी एकत्र येवून आज, शनिवारी संध्याकाळी परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वरांच्याही प्रतिमा या मिरवणुकीच्या ...

परशुराम जयंतीनिमित्त कोल्हापुरात सकल ब्राह्मण समाजातर्फे शोभायात्रा
कोल्हापूर : पंचवीसहून अधिक ब्राह्मण संघटनांनी एकत्र येवून आज, शनिवारी संध्याकाळी परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वरांच्याही प्रतिमा या मिरवणुकीच्या अग्रभागी होत्या. अत्यंत शांततेत परशुराम, शिवाजी महाराज, बसवेश्वरांच्या घोषणा देत ही शोभायात्रा काढण्यात आली.
पेटाळा मैदानावर करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मंत्रोच्चारामध्ये शोभायात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेच्या प्रारंभी भगवे फेटे बांधलेले महिला, पुरूष दुचाकीस्वार होते. यानंतर धनगरी ढोल पथक, जय परशुराम लिहलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले मोठ्या संख्येने आलेले ज्ञाती बंधू, भगिनी, घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज, रथावर आरूढ छत्रपती शाहू महाराज, लेझीम पथके आणि ब्राह्मण समाजातील गेल्या अनेक शतकांमधील आणि विद्यमान महनीय व्यक्तींचे फलक लावलेही वाहने शोभायात्रेमध्ये सहभागी झाली होती.