शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सेवा बजावत असताना कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 14:21 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : येथील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अरुण बालाजी नागरगोजे (वय ३८, मुळ रा. पोटोडा खुर्द, ता. ...

गणपती कोळीकुरुंदवाड : येथील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अरुण बालाजी नागरगोजे (वय ३८, मुळ रा. पोटोडा खुर्द, ता. जळकोट, जि. लातूर, सध्या रा. कुरुंदवाड) यांचे ड्युटीवर असताना ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज, शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलिस ठाण्यासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरगोजे गेल्या चार वर्षांपासून येथील पोलिस ठाण्यात नाईक पदावर सेवेत होते. हेरवाड, अब्दुल लाट सारख्या संवेदनशील गावाची जबाबदारी त्यांच्यावर होती. गुरुवारी रात्रपाळी असल्याने रात्री हेरवाड, अब्दुल लाट, शिरदवाड परीसरात पेट्रोलिंग करत होते. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस मुंबई येथील नियोजित बैठकीसाठी जाणार असल्याने नागरगोजे यांनी त्यांना पहाटे इचलकरंजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सोडून आले होते. पोलिस ठाण्यात परतल्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. मात्र दवाखान्याच्या आवारातच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रथम त्यांच्या राहत्या घरी, त्यानंतर पोलिस ठाणे येथे काहीकाळ थांबवून त्यांच्या मुळ गावाकडे पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले,  आई असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू