शिरोळ (जि. कोल्हापूर) : गणेशोत्सव देखाव्यातून सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक असे वेगवेगळे विषय सादर केले जातात. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त साकारलेले देखावेही अधिकतर राजकीय प्रसंगावर दिसून येत आहेत. तसाच एक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांचा शालेय व राजकीय प्रवास दाखविण्याचा प्रयत्न चित्ररुपी देखाव्यातून युवकाने केला आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दिग्विजय माने यांनी त्यांच्या घरी हा आकर्षक देखावा सादर केला आहे. पक्षाच्या बळकटीसाठी पवार हे राज्यभर दौरे करत आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन दिग्विजय यांनी शरद पवार यांचा राजकीय प्रवास दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. पवार यांच्या जीवनप्रवासाची माहिती चित्ररुपी देखाव्यातून माने सर्वांना करून देत आहेत. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक त्यांच्या घरी गर्दी करीत आहेत.
कोल्हापुरातील शिरोळमध्ये शरद पवारांच्या जीवनावर साकारला चित्ररुपी देखावा -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 12:58 IST