शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या फोटो शेजारी टिपू सुलतानचा फोटो, कोल्हापुरातील मौजे वडगाव येथील शाळेत तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:16 IST

पोलीस छावणीचे स्वरूप

हेरले : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील शाळेत वर्ग सजावटीत महापुरुषांच्या फोटो शेजारी टिपू सुलतानचा फोटो लावल्याने गावात तणाव निर्माण झाला. हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनास धारेवर धरत फोटो लावणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करून त्याला शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली.याबाबत घटस्थळावरून मिळालेली माहिती अशी, मौजे वडगाव येथील बालावधूत हायस्कूलमध्ये शाळेंतर्गत वर्ग सजावट सुरू आहे. शाळेतील शिक्षकांच्या आदेशावरून वर्ग सजावटीसाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा केली होती. या वर्गणीतून महापुरुषांचे फोटो व अन्य सजावटीचे साहित्य खरेदी केले होते. सजावट करताना महापुरुषांच्या फोटोशेजारी एका विद्यार्थ्याने टिपू सुलतानचा फोटो लावला होता. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षकांना सांगितल्यावर टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला.

काल, बुधवारी (दि.२४) सकाळी गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेऊन विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाका, असा आग्रह धरला. मागणीसाठी शाळेतच ठिय्या मारला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.दरम्यान, करवीर पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी आणि गटशिक्षण अधिकारी शाळेत दाखल झाले झाले. यामध्ये मध्यस्थी करत जमावाला नियंत्रणात आणले. दरम्यान, गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले. लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ व शाळा व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करत त्याचा दाखला देण्याचे ठरले. त्यानंतर या वादावर तोडगा पडला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस