शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: थुंकायला गेला अन् जीवाला मुकला, वडाप रिक्षातून प्रवास करताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 12:34 IST

शेजारून जाणाऱ्या टेंपोला डोके आपटल्याने तो ठार झाला

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटे गावाजवळ वडाप रिक्षातील प्रवाशाचे शेजारून जाणाऱ्या टेंपोला डोके आपटल्याने तो ठार झाला. राजेंद्र आनंदा कांबळे (वय ४५, रा. आडूर, ता. करवीर ) असे ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा अपघात सकाळी साडेदहाच्या दरम्यान झाला. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.अधिक माहिती अशी, राजेंद्र कांबळे हे कामानिमित्त कळेला रिक्षामधून निघाले होते. रिक्षाच्या ड्रायव्हरजवळ बसलेल्या राजेंद्रने थुंकण्यासाठी बाहेर डोके काढले. त्याचवेळी कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रक क्रमांक (एम. एच. ५०, एम. ६४५९) याचा जोराचा तडाखा राजेंद्र यांच्या डोक्याच्या मागील बाजूवर बसला. यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता.रिक्षा चालक राजाराम जाधव (रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा) व ट्रक चालक चंद्रकांत आनंदा पाटील (रा. कराड) यांनी राजेंद्रला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ट्रक चालक व रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत राजेंद्रच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.राजेंद्र हा मूळचा राक्षी गावचा. तो आजोळी मामाकडे लहानपणापासून असल्याने आडूर येथेच स्थायिक झाला. गरीब व कष्टाळू असलेल्या राजेंद्रने मोलमजुरी करत कुटुंबाचा गाडा सुरू ठेवला होता. राजेंद्रच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबाचा आधारच हरपला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू