तामिळनाडूत शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीला चित्रकार वॅन गॉग यांचे नाव

By संदीप आडनाईक | Published: March 28, 2024 01:48 PM2024-03-28T13:48:23+5:302024-03-28T13:49:58+5:30

गोल बुब्बुळाच्या दोन नव्या प्रजाती : अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, अगरवाल यांचे संशोधन

A new species of Pali discovered in Tamil Nadu is named after painter Van Gogh | तामिळनाडूत शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीला चित्रकार वॅन गॉग यांचे नाव

तामिळनाडूत शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीला चित्रकार वॅन गॉग यांचे नाव

कोल्हापूर : तामिळनाडू राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरुन पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आलेले आहे. या संशोधनामधे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग सहभाग आहे. यातील एका प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरुन केलेले आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सध्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींचे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान प्रथमतः आढळून आलेल्या आणि नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आलेला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरुन दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळ्या ठरतात. ऑकलँड (न्यूझीलंड) येथील ‘झूटॅक्सा’ या शोधपत्रिकेमध्ये बुधवारी हा संशोधन प्रबंध प्रकाशित झाला आहे.

नव्याने शोधलेली 'निमास्पिस व्हॅनगॉगी' ही प्रजात तामिळनाडू राज्यातील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामधे आढळली. प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांचे नाव दिलेल्या नावावरुन पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या ' द स्टारी नाईट' या चित्राशी मिळतीजुळती आहे. 'निमास्पिस सथुरागिरीएन्सिस' ही प्रजात तामिळनाडूच्या विरुदुनगर जिल्ह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळली. तिच्या आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण निमास्पिस सथुरागिरीएन्सिस असे केले आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सध्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींचे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान प्रथमतः आढळून आलेल्या आणि नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आलेला आहे. नव्याने शोध लागलेल्या या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. -अक्षय खांडेकर, संशोधक, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन

Web Title: A new species of Pali discovered in Tamil Nadu is named after painter Van Gogh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.