शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने कसबा बावड्यात जमावाची घरावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:05 IST

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली

कोल्हापूर : कसबा बावडा, गोळीबार मैदान परिसरात एक तरुणाने टिपू सुलतान याचे स्टेटस ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली; तसेच त्याच्या घरावर जोरदार दगडफेक केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली.कसबा बावडा परिसरात गोळीबार मैदानाला लागून फतेहअली पाणंद असून तेथे राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या मोबाइलवर टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले होते. त्याची माहिती बावड्यातील काही तरुणांना मिळाली. या तरुणास काही तरुणांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. मारहाण होत असल्याचे पाहून तो तरुण त्याच्या घराच्या दिशेने धावला. तरुणांच्या जमावाने त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा मारहाण केली; तसेच त्याच्या घरावर दगडफेक केली. जमाव मोठ्या संख्येने जमला होता. ड्यूटी संपवून घरी गेलेल्या दोन पोलिसांनी तत्काळ हा जमाव पांगविण्यास मदत केली, तसेच जमावाची समजूतही काढली.हा प्रकार समजेल तसा कसबा बावड्यात जमाव वाढू लागला. पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच पोलिस निरीक्षक अरुणकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन, स्टेटस ठेवणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर बावडा परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करावा, त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी परिसरातील तरुणांनी पोलिसांकडे लावून धरली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बावडा परिसरास भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री करून घेतली.दरम्यान, बंडा साळोखे यांच्यासह काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री साडेदहा वाजता पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्यावेळी पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितल्याने कार्यकर्ते निघून गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस