शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

Kolhapur: एसटी बसमध्ये मुलाकडून वारंवार त्रास, कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:32 IST

संतप्त ग्रामस्थांचा कँडल मार्च

पेठवडगाव : किणी (ता. हातकणंगले) येथे सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील बालसुधारगृहात पाठविले आहे. बुधवारी रात्री पेठवडगाव पाेलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, किणी येथील अल्पवयीन मुलगी पेठवडगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्याच गावातील अल्पवयीन मुलगा तिला मागील काही दिवसांपासून वारंवार त्रास देत होता. बुधवारी (दि.१३) महाविद्यालयातून परत येताना एसटी बसमधूनही त्याने मुलीच्या शेजारी बसून पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला.दुपारी घरी परतल्यावर मुलीने आईला संपूर्ण प्रकार सांगितला. आईने कामावरून आल्यावर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. परंतु, सायंकाळी पाचच्या सुमारास आई घरी पोहोचताच मुलगीने घरातील तुळईला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तत्काळ ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. नवे पारगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.ही धक्कादायक घटना समजताच ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली. बुधवारी रात्री उशिरा अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी त्याला कोल्हापूर येथील बालन्याय मंडळात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.दरम्यान, घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोषीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी कँडल मार्च काढत पीडितेला श्रद्धांजली वाहिली. तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तपास पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील करीत आहेत.