कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ उलट्या दिशेने आलेल्या अल्पवयीन कारचालकाने कागलच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वारांना उडवले. शनिवारी (दि. २०) मध्यरात्री एकच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकी चालवणारा गोरक्षनाथ प्रकाश पाटील (वय ३०, रा. गिरगाव, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले अभिजित दिनकर खोत (३४, रा. कासारवाडा, ता. राधानगरी) हे गंभीर जखमी झाले. हे दोघे उचगाव येथील कंपनीतील काम संपवून घरी निघाले होते.गोकुळ शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरक्षनाथ पाटील हे गेल्या वर्षभरापासून उचगाव येथील एका कंपनीत कामाला जात होते. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास काम संपल्यानंतर ते अभिजित खोत या मित्राच्या दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. खोत यांची दुचाकी पाटील चालवत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ समोरून उलट्या दिशेने आलेल्या भरधाव कारने दुचाकीस्वारांना उडवले.
या अपघातात पाटील गंभीर जखमी झाले. सीपीआरमध्ये दाखल करताच उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जखमी खोत यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर अल्पवयीन कारचालक कार सोडून पळून गेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.पालकावरही गुन्हाबेदरकारपणे कार चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन कारचालकावर गुन्हा दाखल केला. तसेच मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला कार चालवायला देणाऱ्या पालकावरही गुन्हा दाखल केला.पाटील कुटुंबीयांवर काळाचा घालागोरक्षनाथ पाटील यांच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात घराची जबाबदारी सांभाळत असलेला गोरक्षनाथ गेला. त्याच्या पश्चात पत्नी, सहा महिने आणि अडीच वर्षांची दोन मुले, आई, लहान भाऊ असा परिवार आहे. सलग दोन आघातांनी पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Web Summary : In Kolhapur, an underage driver speeding in the wrong direction killed a biker and seriously injured another. The accident occurred near Ujalaiwadi bridge. The driver fled but was later apprehended. Police have also registered a case against the parents.
Web Summary : कोल्हापुर में, उल्टी दिशा से तेज गति से आ रहे एक नाबालिग चालक ने बाइक सवारों को टक्कर मार दी, जिससे एक की मौत हो गई और दूसरा गंभीर रूप से घायल हो गया। दुर्घटना उजलाईवाड़ी पुल के पास हुई। चालक भाग गया लेकिन बाद में पकड़ा गया। पुलिस ने माता-पिता के खिलाफ भी मामला दर्ज किया है।