शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हाती नोकरीची ऑर्डर, अन् वडिलांच्या मृत्यूचा मेसेज; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून माणुसकीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:03 IST

नियुक्तीची पर्यायी व्यवस्था

कोल्हापूर : त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती. त्याला शाळा आणि गाव मिळणार म्हणून आनंदातच तो कोल्हापुरात आला. जिल्हा परिषदेची ही समुपदेशन प्रक्रिया शासकीय विश्रामगृहावर सुरू असल्याने तिथे तो मित्रांसह पोहोचला. प्रक्रिया सुरू झाली इतक्यात दुपारी वडील वारल्याचा निरोप त्याला मोबाइलवर मिळाला. एकीकडे काही वेळात हातात नोकरीची ऑर्डर पडणार होती आणि दुसरीकडे वडील वारले होते. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना समजली. ते बाहेर आले आणि त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून जवळ घेतले. मग मात्र त्याला गहिवरून आले आणि त्याने आपल्या अश्रूंना वाट करून दिली.जुन्नर येथील हरिभाऊ दिंगबर विरणक याच्या बाबतीत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. हरिभाऊ याला वडील गेल्याचे समजले. परंतु शिक्षक म्हणून गाव आणि शाळा मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना हेे आता कुणाला सांगायचं, या अस्वस्थेत तो होता. अर्ध्या तासाने त्याने बाहेर नोंदणीसाठी बसलेल्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बातमी सांगितली. या कर्मचाऱ्यांनी चिठ्ठीवर नाव आणि घटना लिहून ही चिठ्ठी कार्तिकेयन यांना पाठवली.कार्तिकेयन लगेचच बाहेर आले आणि या शिक्षकाजवळ गेले. त्यांना येताना पाहूनच हरिभाऊ ओक्साबोक्शी रडू लागला. कार्तिकेयन यांनी त्याला जवळ घेतले आणि त्याचे सांत्वन केले. इतकेच नव्हे तर त्याला एका अधिकाऱ्यांच्या वाहनातून बसस्थानकावर सोडून येण्यास सांगितले. तसेच इकडची काळजी करू नको, असेही सांगूनही त्याला दिलासा दिला. कर्तिकेयन यांच्या या संवेदेशनशील स्वभावाचा अनुभव येथील उपस्थितांना आला.

त्याच्या नियुक्तीची पर्यायी व्यवस्थाहा मुलगा गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागच्या शिक्षकाला त्याच्या जागी उभारून प्रक्रिया पूर्ण करून त्याचे नियुक्तीपत्र घेण्यास कार्तिकेयन यांनी सांगितले आणि नियुक्तीपत्रही दिले. पाठीमागचा मुलगा हरिभाऊ याच्या शेजारच्या गावचाच असल्याने त्याला नियुक्तीपत्र पोहोच करण्यास सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक