शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अधिवेशन संपण्यापूर्वी सुळकुड योजनेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:10 IST

आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली 

इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी सुळकुड योजना कार्यान्वित करण्यासाठी विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्याअगोदर बैठक लावून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मंगळवारी दिले. इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्या लक्षवेधीवर सभागृहामध्ये चर्चा झाली. त्यावेळी फडणवीस आणि नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी उत्तरे दिली. इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. कृष्णा नदीतून येणाऱ्या पाण्यासाठी १८.६०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र या जलवाहिनीस वारंवार गळती लागते. सन २०२२-२३ मध्ये सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम इलेकॉन एनर्जी या कंपनीला दिले आहे. मात्र दोन वर्षे झाले तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही त्यांच्यावर कारवाई करावी व त्या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशी मागणी आवडे यांनी केली. त्यावर मंत्री सामंत यांनी उत्तर देताना म्हणाले, १.९ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. संबंधित यंत्रणेला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले जातील. तसेच सुळकुड पाणी योजने संदर्भात बैठक लावून अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. यावर समाधान न झालेले आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घ्यावी अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले, त्यांनी नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशन संपण्याअगोदर बैठक घेऊन असे आश्वासन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा