राधानगरी : राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी येथील वसंत शिवाजी भोसले यांची १२ लाख ५९ हजारांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. फसवणूक प्रकरणी भाऊसो कृष्णात कुंभार (रा. केळोशीपैकी कुंभारवाडी, ता. राधानगरी) याला अटक करण्यात आली आहे.भाऊसो कुंभार याने वसंत शिवाजी भोसले यांना २५ हजाराला एक तोळा सोने आहे, असे सांगून भोसले यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडल्यानंतर कृष्णात कुंभार याने भोसले यांना तारळे येथे बोलवून दोन लाख पन्नास हजार रुपये घेतले.त्यानंतर शिरगाव येथे बोलावून एक लाख पन्नास हजार रुपये घेतले. भोसले यांनी मोबाइल फोन पेवरून आठ लाख एकोणसाठ हजार कुंभार याला पाठवले. असे एकूण बारा लाख एकोणसाठ हजार रुपये भोसले यांनी कुंभार यांना पाठवले. ठरल्याप्रमाणे कुंभार याने सोने किंवा पैसे ही परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे भोसले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. भाऊसो कुंभार याला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
Web Summary : A Radhanagari resident was cheated of ₹12.59 lakhs by a man promising cheap gold. The accused, Bhauso Kumbhar, lured the victim with a ₹25,000 per tola offer. Kumbhar has been arrested and is in police custody.
Web Summary : राधानगरी के एक व्यक्ति को सस्ते सोने का वादा करके 12.59 लाख रुपये की ठगी की गई। आरोपी भाऊसो कुंभार ने पीड़ित को 25,000 रुपये प्रति तोला का ऑफर दिया। कुंभार को गिरफ्तार कर पुलिस हिरासत में भेज दिया गया है।