शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

Kolhapur: भरधाव डंपर काळ बनून आला अन् चिरडून गेला!, अर्जुनवाडचा एकजण ठार; डंपर चालक फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:08 IST

वाहनाचे चाक बदलताना संभाजीपूर येथे अपघात

शिरोळ : चारचाकीचे पंक्चर झालेले चाक बदलत असताना समोरून भरधाव आलेल्या डंपरच्या धडकेत एकजण ठार झाला. गोरखनाथ आण्णासो गायकवाड (वय ४८, रा. घालवाड रोड, देसाई मळा, अर्जुनवाड) असे मृताचे नाव असून, रामचंद्र नायकू सावंत (२५, रा. शिरोळ) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास संभाजीपूर येथील हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गोरखनाथ गायकवाड व त्यांचे नातेवाईक रामचंद्र सावंत हे दोघेजण चारचाकी वाहनातून कोल्हापूरला गेले होते. शिरोळकडे येत असताना शिरोळ बायपास रोडवरील चौंडेश्वर फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे ते चाक बदलत असताना समोरून आलेला भरधाव डंपर गायकवाड यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. तर सावंत यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात शिरोळ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू