कोल्हापूर: नाताळच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच एकजण कमरेला बंदूक लावून अंबाबाई मंदिरात गेल्याने खळबळ उडाली. याप्रकारनंतर मंदिराच्या चारही दरवाजांना लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर निष्क्रिय असल्याचे समोर आले. यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागले आहे. यासर्व प्रकाराचा एका भाविकानेच केलेला व्हिडिओ सद्या प्रचंड व्हायरल होत आहे.कोल्हापूर शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. देवीच्या दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात भाविकांच्या रांगा लागत आहेत. सुरक्षेसाठी अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजांना मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही एकाने कमरेला बंदूक लावून मंदिरात प्रवेश केल्याचे समोर आले. याप्रकारानंतर मंदिरातील सुरक्षा सुरक्षा यंत्रणा रामभरोसे असल्याचे निदर्शनास आले.कमरेला बंदूक असताना देखील सुरक्षा यंत्रणेने संबंधिताला अडवलं नाही, किंवा अंगझडती घेतली नाही. एका भाविकानेच केलेला हा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. मंदिर प्रशासन, पोलिस प्रशासनाकडून या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
Web Summary : A man entered Kolhapur's Ambabai temple with a gun, raising security concerns. Metal detectors were reportedly inactive. A devotee's video of the incident went viral. Police are investigating the security breach.
Web Summary : कोल्हापुर के अंबाबाई मंदिर में एक व्यक्ति बंदूक लेकर घुस गया, जिससे सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। बताया जा रहा है कि मेटल डिटेक्टर निष्क्रिय थे। एक भक्त का वीडियो वायरल हो गया। पुलिस सुरक्षा उल्लंघन की जांच कर रही है।