शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात दिवसाढवळ्या भरवस्तीत शिरला बिबट्या... उडाला थरकाप, पोलिसांसह तिघांवर हल्ला; बघ्यांवर सौम्य लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:39 IST

Leopard Attack News: कोल्हापूर येथील ताराबाई पार्क परिसरात गजबजलेल्या उच्चभ्रूंच्या मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल वूडलॅण्डमध्ये मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर - येथील ताराबाई पार्क परिसरात गजबजलेल्या उच्चभ्रूंच्या मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल वूडलॅण्डमध्ये मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्याने पोलिस, वनकर्मचाऱ्यासह हॉटेलच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. बघ्यांची गर्दी आणि आरडाओरडीमुळे बिबट्या बिथरला आणि ‘महावितरण’च्या आवारातील ड्रेनेजच्या बंद टाकीत उघड्या दरवाज्यातून आत घुसला.

तीन तासांच्या थरारानंतर बिबट्याला ‘‘ट्रॅन्क्विलाईझर’’ गनने इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. त्याला वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले आहे. बघ्यांची गर्दी आवरताना मात्र पोलिसांना नाकीनऊ आले. बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आल्याने पोलिसांनी लाठीमार केला.

बिबट्याच्या हल्ल्यात शाहूपुरीचे पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल आणि वन कर्मचारी ओंकार काटकर हे जखमी झाले. त्यातील खोंदल यांना जास्त दुखापत झाली आहे.

चेंबर एका बाजूने बंद करून दुसऱ्या टोकाला बांधली जाळी‘महावितरण’च्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये घुसल्यामुळे बिबट्या आतच लपून बसला होता. चेंबरच्या एकाबाजूला प्लायवूड टाकून ते बंद केले आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाळी लावली. बिबट्याने हल्ल्याच्या तयारीत उसळी मारून जाळीच्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच कर्मचाऱ्यांनी त्याला दाबून धरले आणि जाळीत अडकवले. वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी गनने प्राथमिक स्तरावरील भुलीचे इंजेक्शन देऊन ‘ट्रॅन्क्विलाईझ’ (बेशुद्ध) केले, त्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. त्यानंतर त्याच्या पायात हातातील सिरींजने दुसरे इंजेक्शन टोचण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध बिबट्याला उचलून पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्यानंतर वन्यजीव विभागाच्या उपचार केंद्रात चिखली येथे नेण्यात आले. 

चार वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्याजेरबंद केलेला बिबट्या चार वर्षांचा नर असून, पूर्ण वाढ झालेला आहे. हल्ला केलेल्या जखमा पाहता, त्याच्या ताकदीचा अंदाज येतो. जेरबंद केलेला बिबट्या चार वर्षाचा नर आहे. हल्ला केलेल्या जखमा पाहता, त्याच्या ताकदीचा अंदाज येतो. १० ते १५ फुटांचा अडथळा सहजपणे उडी मारून ओलांडत तो पुढे जात होता, यावरुन  कमालीची चपळताही दिसून आली. 

  

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Enters Kolhapur, Attacks Citizens; Police Use Mild Force

Web Summary : A leopard entered a residential area in Kolhapur, attacking police and citizens. It was captured after a three-hour operation using tranquilizer injections. Three people were injured. Police used mild force to control the crowd.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या