पन्हाळा: झुंजीत पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ येथे दोन ते अडीच वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांचे समोर बिबट्याचे शवविच्छेदन केले असता झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची पन्हाळा परिक्षेत्र वनअधिकारी अजित मोहिते यांनी माहिती दिली. मध्यरात्री नंतर हा प्रकार घडला असावा अंदाज आहे.आपटी सोमवार पेठ येथील विलास शामराव गायकवाड यांना सकाळी बिबट्या मृत अवस्थेत दिसला. ते जनावरांना वैरण टाकण्यासाठी गोठ्याकडे निघाले असता त्यांना ही घटना निर्दशनास आली. बिबट्याच्या घशा जवळ मोठे दात घुसल्याच्या जखमा आढळून आल्या. त्याचा पाय दोन दगडाच्यामध्ये अडकल्यामुळे तो तिथेच पडला होता. त्याच्या पाठीवरही जखमा झाल्या होत्या. माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी दाखल होत मृत बिबट्यास ताब्यात घेतले. यावेळी बाबुराव गिरी, रंगराव उदाळे, रत्नाकर गायकवाड, अजिंक्य बच्चे, शांताराम अस्वले आदी वन कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी पन्हाळगडावर आणले. सोमवार पेठ हा परीसर बिबट्याचा आधिवास आहे. या परीसरात अंदाजे लहान मोठे बारा ते पंधरा बिबटे असावेत असा अंदाज आहे.
Web Summary : A two-year-old leopard died near Panhala Fort in Kolhapur after a fight. Forest officials suspect the leopard was attacked, evidenced by bite marks and injuries. The animal's body was found by a local farmer near Somwar Peth, a known leopard habitat.
Web Summary : कोल्हापुर के पन्हाला किले के पास दो साल के तेंदुए की लड़ाई में मौत हो गई। वन अधिकारियों को संदेह है कि तेंदुए पर हमला किया गया था, जिसके प्रमाण बाइट मार्क्स और चोटें हैं। जानवर का शव एक स्थानीय किसान को सोमवार पेठ के पास मिला, जो तेंदुए का निवास स्थान है।