शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उसाचा फड पेटवला, आगीत होरपळून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 19:33 IST

शेतात लपून बसलेला बिबट्या पळून गेल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले

शिरोली : नागाव (ता. हातकणंगले) येथील गाडीवड परिसरात अमित चिंतामणी सोळंकुरे यांचे शेत आहे. मंगळवारी शेतातील आडसाली ऊस पेटवून तोड सुरू केली होती. यावेळी उसाचा फड पेटवला असता त्यामध्ये नवजात दोन-तीन दिवसांच्या बिबट्याच्या बछड्याचा होरपळून मृत्यू झाला. तर शेतात लपून बसलेला बिबट्या पळून गेल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले.बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास शेतामध्ये शेतकरी गेले असता, बिबट्याच्या बछड्याचा होरपळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत वनविभाग व शिरोली पोलिसांना कळविले. त्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून ताे बिबट्याचा बछडाच असल्याचे सांगितले. पशुधन अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन करून त्याचे मुडशिंगी येथील शासकीय जागेत दहन केले.यावेळी वनअधिकाऱ्यांनी या परिसरात दोन दिवस ड्रोनच्या साहाय्याने एक पथक कार्यरत ठेवून पाहणी करणार असल्याचे सांगितले. या बछड्याच्या शोधात बिबट्या रात्री येण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाल्याने नागाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यावेळी वनपाल एम. एस. पोवार, आरएफओ रमेश कांबळे, पशुधन विकास अधिकारी अश्विनी बोगार्डे, वनरक्षक विकास घोलप, बचाव पथकाचे अमोल चव्हाण, नागावचे पोलिस पाटील बाबासो. पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसfireआगleopardबिबट्याforest departmentवनविभाग