शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी, जंगल क्षेत्रातील वणव्याचा झालायं वणवाच; जैवविविधता, काजू-आंब्याच्या बागा होरपळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:49 IST

काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने उध्वस्त

सदाशिव मोरेआजरा : आजरा परिसरात होळीच्या पार्श्वभूमीवर खासगी जमिनीसह जंगल परिसरात लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट झाली आहे. वणव्यात हजारो  स्थानिक प्रजातीच्या झाडांसह काजू व आंब्याच्या बागा होरपळल्या आहेत. वाढल्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने जमीनदोस्त झाली आहेत.गेल्या आठ दिवसापासून आजरा तालुक्यात सुरू असलेला वणवा अद्याप संपलेला नाही. दररोज खाजगी जमिनीसह जंगल क्षेत्राला आग लागलेलीच आहे. दुपारच्या वेळात लागलेली आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांसह वन कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र उन्हाचा तडाका व जोरदार वाऱ्यामुळे क्षणात आग सर्वत्र पसरत आहे. आगीचे लोट ३० ते ३५  फूट उंचीवर जात आहेत. त्यामुळे आग विझवण्यातही अडचणी येत आहे.वणव्यामुळे सरपटणारे प्राणी, लहानपक्षी व त्यांची घरटी जळून जात आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेला व मुबलक जैवविविधता असलेल्या आजऱ्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वन विभागाच्यावतीने जंगलांना आग लागू नये म्हणून जाळ रेषा काढली आहे मात्र या जाळ रेषेच्या आतमध्येही जंगलांना आग लागली आहे. सोहळे, वझरे, मडिलगे, सुलगाव, चांदेवाडी, लाटगांव, चित्री धरण परिसरात जंगलांसह खासगी क्षेत्रात लागलेला वणवा आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. गेल्या आठ दिवसापासून होळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्रच वणवे लागल्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाला या वणव्यांचा वणवा झाला आहे.

वणव्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नसर्वत्र वणवे लागल्यामुळे जनावरांचे गवत व पिंजर जळून खाक झाले आहे. वर्षभरासाठी लागणारे गवत व पिंजर साठवून ठेवलेले आहे. मात्र गवतालाच वणवे लागल्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

पिकांच्या उत्पन्नावर पाहिलेली स्वप्ने उध्वस्तकाजू व आंब्याच्या बागांना पोषक वातावरणामुळे चांगला मोहोर आला होता. मात्र वणव्यामुळे अनेक ठिकाणच्या काजू व आंब्याच्या बागा जळाल्या आहेत. त्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने चालू वर्षी उध्वस्त झाली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलfireआग