शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळासाठी २९० कोटी रुपयांचा निधी, २.६० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:19 IST

विस्तारीकरणांतर्गत धावपट्टीची वाढ करण्यात येणार

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या विकास व विस्तारीकरणासाठी २९० कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चास राज्य सरकारने सोमवारी सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली. या निधीतून विमानतळासाठी भूसंपादन व कोल्हापूर-हुपरी या राज्यमार्गाच्या वळतीकरण करण्यासाठी २.६० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याचा अध्यादेश काढला.कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत धावपट्टीची वाढ करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादन करणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने सुरुवातीला २७४ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तो मंजूर होऊन भूसंपादनासाठी काही निधी देण्यात आला होता. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून अंदाजे रक्कम कळवण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात जमीन संपादन करतेवेळी जास्तीचा निधी लागला आहे. प्रत्यक्षात संयुक्त मोजणीअंती २६.६५.५७३५ हेक्टर आर. इतकी जमीन संपादित करायची आहे शिवाय कोल्हापूर-हुपरी या राज्यमार्गाचे वळतीकरण करण्यासाठी ३.६० हेक्टर आर. जमीन संपादित करुन त्या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करायचे असल्याने या कामासाठी २९० कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्य सरकारला पाठवला होता. त्यानुसार राज्य सरकारने या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Airport Expansion: ₹290 Crore Fund Approved, Land Acquisition to Begin.

Web Summary : The state government approved ₹290 crore for Kolhapur airport's expansion, including land acquisition for runway extension and road diversion. 2.60 hectares of land will be acquired for the project, facilitating vital infrastructure improvements and enhanced connectivity.