शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या २८ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 20:06 IST

गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे दाखवले आमिष

उद्धव गोडसे

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीसह अन्य कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांसह २८ जणांवर आज, शुक्रवारी (दि. २५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याच्यासह सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील संशयितांचा यात समावेश आहे. संशयितांनी कोल्हापूर जिल्ह्यातील १६९ गुंतवणूकदारांची ४ कोटी ८९ लाख ७२ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रोहित सुधीर ओतारी (वय २५, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.शाहूपुरी पोलिस आणि गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.एस. ट्रेडर्स कंपनीने २०१७ पासून दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीचे काही वर्ष ठरल्यानुसार परतावा दिला. मात्र ऑगस्ट २०२२ पासून गुंतवलेली मुद्दल आणि परतावा देणे बंद केले. कंपनीच्या कार्यालयांमध्ये वारंवार मागणी करूनही मुद्दल आणि परतावा मि‌ळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंत‌णूकदारांच्या लक्षात आले.अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील १६९ गुंतवणूकदारंनी एकत्र येऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवला आहे. ए.एस. ट्रेडर्ससह कंपनीच्या १७ सहकंपन्यांनी गुंतवणूकदारांची ४ कोटी ८९ लाख ७२ हजार ६४९ रुपयांची फस‌णूक केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कंपनीचा विस्तार वाढला असून, देशभरातील सुमारे दोन लाख गुंतवणूकदारांची किमान दोन हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज गुंतवणूकदारांनी वर्तवला आहे.यांच्यावर झाले गुन्हे दाखललोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली), नासिक इस्माईल मुल्ला (पन्हाळा, जि. कोल्हापूर), सुधा सुधाकर खाडे (रा.गडहिंग्लज, कोल्हापूर), संतोष नंदकुमार कंभार (पलूस, सांगली), बापू किसना हजारे (कोल्हापूर), विक्रम जोतिराम नाळे (सांगरुळ, कोल्हापूर), रवींद्र प्रदीपराव देसाई (नागाळा पार्क, कोल्हापूर), विजय जोतिराम पाटील (रा. खुपिरे, ता. करवीर, कोल्हापूर), महेश बाजीराव आरेकर (रा. आरे, कोल्हापूर), नामदेव पाटील (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), बाळासो कृष्णात धनगर (रा. नेर्ली), अमर विश्वास चौगले (रा, गडहिंग्रलज), प्रवीण विजय पाटील (रा. गडहिंग्लज), संतोष रमेश मंडलिक (बेळगाव), युवराज तानाजी खेडकर (रा. येडेमच्छिंद्र, सांगली),

दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (रा. कोडोली, पन्हाळा), शिवाजी धोंडीराम शिंदे (रा. खुपिरे, कोल्हापूर), विनायक विलास सुतार (रा. राजारामपुरी, कोल्हापूर), सुवर्णा श्रीरंग सरनाईक (शिवाजी पेठ), महेश बळवंत शेवाळे (रा. पन्हाळा), शिवाजी कुंभार (रा. कोल्हापूर), सागर पंडितराव पाटील (सांगली), चांदसो काझी (शिरोली, कोल्हापूर), प्रतापसिंह विनायक शेवाळे (रा. घुणकी, कोल्हापूर), अमित शिंदे (रा. माहिती नाही), अभिजीत साहेबराव शेळके (रा. शाहूपुरी), दीपक बाबूराव मोहिते (आरे. ता. करवीर, जि. कोल्हापूर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस