शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

पुणे-बेंगळुरु महामार्गावरील मांगुर फाटा येथे उड्डाणपूल होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दर्शवली सहमती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 19:25 IST

शरद पवार यांची शिष्टाई, सीमावासीयांच्या पाठपुराव्याला अखेर यश

दत्ताञय पाटील म्हाकवे : पुणे-बेंगलोर महामार्गावरील वेदगंगा नदीनजीक मांगुर फाटयावर भरावाऐवजी पिलेरचा पुल व्हावा यासाठी सीमाभागातील शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक दळणवळण मंञी नितीन गडकरी यांची भेट घेतली.यावेळी सीमावासीयांच्या व्यथा ऐकून ना गडकरी यांनी मांगुर फाटा येथे पिलेरचा पुल उभारण्यासाठी सहमती दर्शवली.तसेच, तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरुन चर्चाही केली. यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यशस्वी शिष्टाई केली. या चर्चेमुळे सीमावासीयांना दिलासा मिळाला आहे.युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीचे के डी पाटील, चंद्रशेखर सावंत, अजित पाटील, दीपक पाटील, सुदीप वाळके, शिवाजी पाटील, अमोल पाटील, नानासाहेब पाटील, लक्ष्मीकांत पाटील, निरंजन पाटील यांनी ना.गडकरी यांची भेट घेतली. यावेळी मुरगुडचे नगरसेवक राजेखान जमादार उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्गावर मांगुर फाटा येथे सद्या भरावा टाकून पुलाचे काम सुरू आहे. हा भराव १२ फुटापेक्षा अधिक असल्यामुळे वेदगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. यामध्ये कर्नाटकातील चार तर १८ गावांतील शेतीसह घरात पाणी शिरणार आहे. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिक अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. यासाठी काकासाहेब सावडकर (आणूर), धनंजय पाटील (म्हाकवे), दिगंबर अस्वले (मळगे),शिवाजी पाटील (बानगे), अमित पाटील (निढोरी) यासह अनेकजण परिश्रम घेत आहेत.नेतेमंडळींचेही पाठबळ..मांगुर फाटा येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी ना. ज्योतिरादित्य सिंधिया, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समरजित घाटगे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार निलेश लंके, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार संजय घाटगे यांनीही सीमावासीयांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शरद पवार यांच्या भेटीने कलाटणी..१६ जानेवारी रोजी शरद पवार यांनी मांगुर फाटा येथे भेट दिली होती. शिष्टमंडळाने दिल्लीला यावे ना. गडकरी हे याबाबत निश्चित सकारात्मक विचार करतील असा विश्वासही त्यांनी दिला होता. पदरमोड करून सीमाभागातील शिष्टमंडळ विमानाने दिल्लीला गेले होते. ना.गडकरी यांनी अगदी व्यवस्थित चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतल्याने सीमावासीयात चैतन्य निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरीSharad Pawarशरद पवार