शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञाताने लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर, दुचाकी जळून खाक; कोल्हापुरातील उत्तुर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 18:31 IST

आग विझवण्यासाठी मदतीला धावले अन् त्यांचीच दुचाकी जळाली

उत्कर्षा पोतदारउत्तुर : अज्ञाताने गवत पेटवण्यासाठी लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होवून रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी जळून खाक झाली. उत्तुर येथे गडहिंग्लज- गारगोटी रस्त्यावर ही घटना घडली. गडहिंग्लज- गारगोटी रस्त्यावरील बेलेवाडी घाटात धामणे गावाच्या बाजूने अज्ञात इसमाने गवत पेटवण्यासाठी लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर झाले. ही आग झपाट्याने पसरली. येथील नवकृष्णा व्हॅलीच्या चोहीकडे आग पसरत होती. अचानक पसरत असलेली आग पाहताच शाळेतील प्राचार्य रामकृष्ण मगदूम व शाळेतील सर्व शिक्षक एकत्र येऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी दुचाकीने आजऱ्याहून पिंपळगाव येथे नातेवाईकांकडे जाणाऱ्या गिरीश कुंभार हेही आग विझवण्यासाठी मदतीला धावले.शाळेजवळील आग विझली परंतु काही वेळाने रस्त्याच्या कडेने आग पसरत गेली व कुंभार यांची रस्त्यावर उभी असलेली दुचाकी जळाली. वारेही जोरदार असल्याने गवत पेटवण्यासाठी लावलेल्या आगीच्या घटना उग्र स्वरूप धारण करत आहेत. याबाबत योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग