शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Kolhapur- ऑफिसमधील विषय बारमध्ये काढला, दोन मित्रांमध्ये राडा झाला

By उद्धव गोडसे | Updated: November 7, 2023 13:50 IST

करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : बिअर बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या मित्रांमध्ये एकाने ऑफिसमधील विषय काढला. याचा राग आल्याने दारूच्या नशेतील मित्राने दुस-या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. ५) रात्री आठच्या सुमारास जरगनगर येथील एका बिअर बारमध्ये घडला.याबाबत महेंद्र मोहन चौगुले (वय ३५, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, करण रावण (रा. दिलबहार तालीमजवळ, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र चौगुले आणि करण रावण हे दोघे मित्र असून, शहरातील एका कुरिअर कंपनीत नोकरी करतात. रविवारी रात्री हे दोघे जरगनगर येथील एका बिअर बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले. दारू पित असताना चौगुले याने ऑफिसमधील विषय काढला. 'बारमध्ये बसल्यावर ऑफिसमधील विषय का काढलास? आता तुला बघून घेतो,' असे म्हणत करण रागाने निघून गेला.त्यानंतर अर्ध्या तासाने परत येऊन त्याने शिवीगाळ करीत चौगुले याला मारहाण केली. झटापटीत ढकलून दिल्याने चौगुले याच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला आणि कपाळावर जखम झाली. चौगुले याने सीपीआरमध्ये उपचार घेऊन करण याच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस