शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलं रक्ताने पत्र, केली 'ही' मागणी; अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:21 IST

थकबाकीदार कर्जदारांचे कर्ज माफ झाले मात्र कर्जाची परतफेड करणारा शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.

कुरुंदवाड :  प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे अनुदान मिळावे, अशी मागणी शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकरी विश्वास बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. अनुदान न मिळाल्यास बेमुदत प्राणांतिक उपोषण करण्याचा इशाराही पत्रात लिहिले आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या या पत्राची मुख्यमंत्री दखल घेणार की केराची टोपली दाखविणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.2019 च्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तत्कालीन सरकारने कर्जमाफी केली होती. तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. थकबाकीदार कर्जदारांचे कर्ज माफ झाले मात्र कर्जाची परतफेड करणारा शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाहीर करण्यात आलेला 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून अनुदान मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या मागणीची दखल मुख्यमंत्री घेतात की या पत्राला केराची टोपली दाखवली जाते याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे