शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा खपविण्यासाठी आलेल्या कुटुंबाला घेतले ताब्यात, कोल्हापुरातील कबनुरात केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 11:47 IST

त्यांनी या नोटा कोठून आणल्या, याबाबत अधिक तपास सुरू

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे बनावट नोटा खपविण्यासाठी कारमधून आलेल्या एका परिवारातील तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५००, २०० व ५० रुपयांच्या २३ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्यांनी या नोटा कोठून आणल्या, याबाबत अधिक तपास सुरू आहे.राजन नामदेव काळोखे (वय २९), पुतळाबाई नामदेव काळोखे (५१) आणि धनश्री राजन काळोखे (२२, सर्व रा. महादेववाडी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील कबनूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील चहाच्या टपरीवर मंगळवारी दुपारी कारमधून उतरलेल्या दोघींनी ५०० रुपयांच्या मोडीची मागणी केली. त्यांच्यासोबत एक लहान मूलही होते.

त्यावेळी काहींना त्यांचा संशय आल्याने नागरिकांनीच त्यांच्यावर पाळत ठेवली. हे कुटुंबीय कबनूरकडे निघाले असता त्यांना अडवून नागरिकांनी चौकशी केली. त्यामध्ये त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना घेऊन नागरिक शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले. तेथे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांच्याकडे वरीलप्रमाणे बनावट नोटा आढळल्या.दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंबीय कबनूर येथील उरुसानिमित्त तेथे फेरीवाले, फुले, हार विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते अशा छोट्या व्यावसायिकांची गर्दी होऊ लागल्याने त्याचा गैरफायदा घेत नोटा खपविण्यासाठी आले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांचे नेमके कोणत्या टोळीशी संबंध आहेत का, याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. प्राथमिक तपासानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितले.सोलापूर कनेक्शन?सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे एका बनावट नोटांच्या छापखान्यावर तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्याशी काही कनेक्शन जुळते का, याचीही तपासणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस