शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद ट्रकचालकाची सहा दुचाकींना धडक, नागरिकांनी पाठलाग करत दिला चोप; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:42 IST

टायर फुटला, ट्रक व्हीलवर पळवला

कोल्हापूर : मद्यधुंद ट्रकचालकाने बेदरकारपणे ट्रक चालवत रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास फुलेवाडी परिसरातील पाच ते सहा दुचाकींना धडक दिली. नागरिकांनी पाठलाग करून या ट्रकचालकास बेदम चोप देत ट्रकची तोडफोड केली. त्यात ट्रकचालक शीतल काशीनाथ शिपुगडे (वय ३२, रा. बापट कॅम्प) हा जखमी झाला आहे.राजापूर येथून चिरा भरून ट्रकचालक शीतल शिपुगडे कोल्हापूरच्या दिशेने येत होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याने कळे येथील एका धाब्यावर मद्यप्राशन आणि जेवण केले. तशा अवस्थेतच कोल्हापूरकडे चाललेल्या या ट्रकचालकाने वाटेत रस्त्याकडेला थांबलेल्या काही दुचाकींना धडक दिली.टायर फुटला, व्हीलवर पळवला ट्रकवाटेत त्याच्या ट्रकचा एका बाजूचा टायरही फुटला; पण त्याने ट्रक न थांबवता केवळ व्हीलवर कोल्हापूरकडे पलायन केले. नंतर फुलेवाडीजवळही त्याने काही दुचाकींना धडक दिली. वाटेत त्याने अनेकांच्या अंगावर वाहन घातले; पण अनेकांनी त्याला चुकविल्याने त्यांचा जीव बचावला.पाठलाग करत फुलेवाडीजवळ दिला चोप, ट्रकची तोडफोडदरम्यान, कळे येथील काही दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करत फुलेवाडीपर्यंत आले. त्यांनी चालकाला वाटेतच अडवून थांबविले. ट्रकमधून उतरल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील चालकाला जमलेल्या नागरिकांनी मारहाण करत ट्रकची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालक शीतलला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात