शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानावेळी कोल्हापुरात शिरोलीमध्ये भगव्या टोपीवरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 13:20 IST

शिरोली : भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी विरोध केला, असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला. तर आम्ही टोपीवर कुठे ...

शिरोली : भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी विरोध केला, असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला. तर आम्ही टोपीवर कुठे पक्षाच चिन्ह आहे का हे पाहण्यासाठी आम्ही चौकशी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा संपूर्ण प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावात सकाळच्या सुमारास घडला. यावरून शिरोली गावातील कन्या विद्या मंदिर या बूथवर सुमारे एक तास तणाव निर्माण झाला होता.शिरोली जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर या मतदान केंद्रांबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमावासह उभे होते. यातील काही कार्यकर्ते इतरत्र फिरत असताना तर काही कार्यकर्ते भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी भगवी टोपी काढण्यास सांगितली. तसेच त्या टोपीवर कुठे पक्षाचे चिन्ह आहे का हे तपासून पाहिले.यावर हिंदूत्ववाती कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला. आमच्या टोप्या काढणार असाल तर इतर समाजाच्या सुद्धा टोप्या काढा असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यातून जवळपास एक तास तणाव निर्माण झाला होता. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध अथवा विरोध नाही.

कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी विरोध केला. या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी सरपंच शशिकांत खवरे आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रिया संपल्यावर जाहीर निषेध केला.

आम्ही घातलेल्या भगव्या टोपीला पोलिसांनी विरोध केला. मग इतर समाजाच्या सुद्धा टोप्या काढून मतदान करायला सांगा. आम्ही भगव्या टोप्या घालून मतदान करणार. - प्रशांत कागले - विश्व हिंदू परिषद 

शिरोली येथे भगव्या टोपीला पोलिसांनी विरोध केला नाही. आम्ही भगव्या टोपीवर राजकीय पक्षाचे चिन्ह आहे का हे तपासून पाहिले आहे. विनाकारण गैरसमज निर्माण झाला आहे.  - सुरेश गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024