शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मुंबईतील कमिशन एजंटची एसटीतून एक कोटीच्या दागिन्यांची सॅक लंपास, कोल्हापुरात घडला प्रकार 

By उद्धव गोडसे | Updated: July 1, 2024 16:22 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू

कोल्हापूर : सराफांना दागिने पुरवणारे कमिशन एजंट सुजितसिंग सुखदेवसिंग चौहान (वय ४८, रा. वडाळा पूर्व, मुंबई) यांची सुमारे एक कोटी रुपये किमतीचे दीड किलो सोन्याचे दागिने असलेली सॅक चोरट्याने लंपास केली. हा प्रकार रविवारी (दि. ३०) रात्री साडेसातच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकात पुण्याला जाणा-या एसटीत घडला. याबाबत चौहान यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफांना होलसेल दागिने पुरवणारे कमिशन एजंट सुजितसिंग चौहान हे २८ जून रोजी मुंबईतून दागिने घेऊन निघाले. २८ आणि २९ जून रोजी ते पुण्यात मेहुण्याकडे थांबून काही सराफांना भेटले. त्यानंतर रविवारी दुपारी ते दोनच्या सुमारास एसटीने कोल्हापुरात पोहोचले. गुजरीत जाऊन ते तीन सराफांना भेटले. मात्र, त्यांच्याकडून कोणीच दागिन्यांची खरेदी केली नाही. त्यानंतर सायंकाळी पुण्याला परत जाण्यासाठी ते मध्यवर्ती बसस्थानकात गेले. साडेसातला सुटणा-या विनावाहक शिवनेरी एसटीचे तिकीट मिळाल्यानंतर ते एसटीत बसले.

तीन नंबर सिटवर बसताना त्यांनी पाठीवरील काळ्या रंगाची दागिन्यांची सॅक सिटवरील रॅकमध्ये ठेवली. पाच ते सात मिनिट ते मोबाइल पाहत बसले. त्यानंतर काही वेळाने रॅॅकमध्ये पाहताच त्यांना दागिन्यांची सॅक आढळली नाही. त्यांनी एसटीत आणि आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड किलो दागिन्यांच्या सॅकची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस