शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृहाचे पेट्रोल पंपासह श्रृंखला उपहारगृह सुरू होणार

By सचिन यादव | Updated: March 22, 2025 12:27 IST

तीन महिन्यांत उभारणी : केरळच्या धर्तीवर उपहारगृह साकारणार

सचिन यादवकोल्हापूर : कोल्हापूरचे कळंबा मध्यवर्ती कारागृह आता विविध सुविधांसाठी अद्ययावत होत आहे. केरळ कारागृहाच्या धर्तीवर श्रृंखला उपहारगृह, कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी स्वतंत्र इमारत, नातेवाईकांच्या ई- मुलाखतीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्स खोलीची स्वतंत्र व्यवस्था होणार आहे. त्यासह कारागृहाच्या पेट्रोल पंपाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या तीन महिन्यांत हे चार नवे प्रकल्प सुरू होत आहेत. सध्याच्या कारागृहाच्या समोर सुरू असलेल्या सर्व्हिसिंग सेंटर जवळील परिसरात या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.गृह विभागाने राज्यातील कारागृहात पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कळंबा मध्यवर्ती कारागृहाने पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. या पंपासाठी मंजुरी मिळाली आहे. आवश्यक त्या एनओसी मिळाल्यानंतर मे महिन्यात हा पंप सुरू होण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियम कंपनीचा हा पंप असून त्यासाठी कारागृह प्रशासनाकडून दहा कैद्यांची निवड करण्याचे काम सुरू असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.हे कैदी खुल्या कारागृहातील असतील. त्यांना तुरुंग प्रशासनाच्या नियमांनुसार वेतन दिले जाईल.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देशातील अनेक राज्यातील कारागृहात ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सिस्टीम’ सुरु झाली. कळंबा कारागृहातही सध्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात येते. आता त्यासाठी स्वतंत्र व्हिडीओ कॉन्फरन्स विभाग केला जाणार आहे. त्यामध्ये नातेवाईकांच्या भेटीगाठीसाठीही ई-मुलाखतीची व्यवस्था केली जाणार आहे.केरळच्या धर्तीवर उपहारगृहाची सुरुवात होत आहे. श्रृंखला उपहारगृह असे त्याला नाव दिले आहे. सुमारे दोन गुंठे जागेत हे उपहारगृह सुरू होत आहे. त्यासाठी खुल्या कारागृहातील २० कैद्यांची निवड केली आहे. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठीही स्वतंत्र इमारत असेल. त्यात लाकडी वस्तू, शिवणकाम, कपडे, रुमाल आदी वस्तूची विक्री केली जाणार आहे.

७०० सीसीटीव्ही कॅमेरे, १०० हॉटस्पॉटकैद्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण कारागृह परिसरात ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोबाइल जामरही बसविले आहेत. कैद्यांना गरम जेवण देण्यासाठी १०० हॉटस्पॉटचा प्रस्तावही मंजूर झाला आहे.

श्रृंखला उपहारगृह, व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा येत्या दोन महिन्यांत सुरु होतील. कारागृहाच्या पेट्रोल पंपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ना हरकत दाखलेही लवकरच मिळतील.  - नागनाथ सावंत, वरिष्ठ अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसjailतुरुंग