शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

११२ कोटी फिक्स डिपॉझिट देण्याचे आमिष, कोल्हापुरातील पूजा भोसलेवर पुण्यात आणखी एक गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:18 IST

पूजा भोसले ही मे २०२३ पासून पसार आहे

कोल्हापूर : निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टच्या नावे गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी पूजा अजित भोसले-जोशी (सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे, मूळ रा. राजारामपुरी, कोल्हापूर) हिच्यावर पुण्यात भोसरी पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तिच्या नावे असलेल्या रकमेतील ११२ कोटी रुपये दहा वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी ही फसवणूक केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. पूजा भोसले ही मे २०२३ पासून पसार आहे.निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टकडून २५ लाखांचा धनादेश देण्याचे आमिष दाखवून पूजा भोसले आणि तिच्या सहकाऱ्यांनी शेकडो लोकांकडून प्रत्येकी साडेचार हजारांचे नोंदणी शुल्क भरून घेतले होते. ही फसवणूक लोकमतने उघडकीस आणताच तिच्यासह अन्य सहकाऱ्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भीतीने मे २०२३ पासून ती पसार झाली.मात्र, पुण्यात राहून तिने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आपल्या नावे बँकेत वडिलांनी कोट्यवधी रुपयांची ठेव ठेवली आहे. यातील काही रक्कम ५० लोकांच्या नावे फिक्स डिपॉझिट केली जाणार आहे. फिक्स डिपॉझिट घेण्यासाठी आयकराचे ३ कोटी रुपये भरावे लागतील, असे सांगून सहा जणांच्या टोळीने फिर्यादी दत्तात्रय नामदेव येळवंडे (वय ५९, रा. भोसरे, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्याकडून दोन कोटी ६५ लाख रुपये उकळले आहेत. या गुन्ह्याचा तपास भोसरी पोलिसांकडून सुरू आहे.सहा जणांवर गुन्हायाप्रकरणी अजय राजाराम खडके, स्वामीनाथन जाधव, ॲड. सोमनाथ कदम, सतेंद्र विष्णुपंत मोडक, ओंकार बजरंग जावीर आणि पूजा अजित भोसले-जोशी (सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील पूजा भोसले-जोशी हिला गोव्यातून अटक केल्याची माहिती मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Pooja Bhosle faces more fraud charges in Pune.

Web Summary : Pooja Bhosle, already accused of fraud, faces another case in Pune. She allegedly lured victims with fixed deposit schemes, swindling ₹2.65 crore from one person by promising high returns on a ₹112 crore deposit. Bhosle is reportedly arrested in Goa.