शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

Kolhapur: विनापरवानगी दुचाकी रॅली मनसेला भोवली, पदाधिका-यांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल

By उद्धव गोडसे | Updated: January 29, 2024 11:55 IST

कोल्हापूर : मनसेच्या पदाधिकारी निवडी झाल्यानंतर रविवारी (दि. २८) दुपारी उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी न घेता शहरातून दुचाकी रॅली ...

कोल्हापूर : मनसेच्या पदाधिकारी निवडी झाल्यानंतर रविवारी (दि. २८) दुपारी उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी न घेता शहरातून दुचाकी रॅली काढली. याबाबत शाहूपुरी पोलिसांनीमनसेचे नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, उत्तर विभागातील जिल्हाध्यक्ष नीलेश धुमा, दक्षिण विभागातील जिल्हाध्यक्ष राजू पाटील आणि करवीर मतदार संघाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल केला.मनसेच्या नवीन पदाधिकारी निवडी रविवारी दुपारी पार पडल्या. याचा आनंद साजरा करण्यासाठी नूतन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील ताराराणी चौकातून दुचाकी रॅली काढली. स्टेशन रोडमार्गे शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या रॅलीत सुमारे ३०० जणांचा सहभाग होता. विनापरवानगी दुचाकी रॅली काढून वाहतुकीला अडथळा करू नये, अशी सूचना शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी मनसेच्या पदाधिका-यांना केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पदाधिका-यांनी रॅली काढली. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात बेदरकारपणे दुचाकी चालवल्याबद्दल आणि वाहतूक खोळंबा केल्याबद्दल पोलिसांनी मनसेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती निरीक्षक सिंदकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMNSमनसेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस