शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय केले रिकामे, शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:47 IST

सुहास जाधव पेठ वडगाव : येथील लाटवडे रोडवरील यादव कॉलेजवर मित्रांने ४० मिनिटापुर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर ...

सुहास जाधवपेठ वडगाव : येथील लाटवडे रोडवरील यादव कॉलेजवर मित्रांने ४० मिनिटापुर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत महाविद्यालय रिकामे केले. तसेच परिसरात नाका बंदी केली. घटनास्थळी एटीएस व बॉम्ब शोधक पथक कॉलेज परिसरात शोध घेतला. मात्र अखेर ही अफवा असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.वडगाव लाटवडे रस्त्यावर विजयसिंह यादव महाविद्यालय व बळवंतराव यादव ज्युनियर कॉलेज यांचे संयुक्तिक इमारत आहे. यामध्ये डायल 112 ला सकाळी दहा वाजता अमन मकानदार यांनी चार्ज घेतला. आणि अवघ्या तीन मिनिटात यादव काॅलेज मध्ये कोणी तरी बाॅम्ब ठेवला आहे असे फोन वरून सांगितले अन् फोन कट केला.या घटनेची पोलिसांनी माहिती मिळताच पोलिस यंत्रणा अ‍ॅक्शन मोड वर येत अवघ्या तीन ते चार मिनिटात कॉलेजमध्ये आले. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोडून देण्यास सांगितले. दरम्यान घटनास्थळी वडगाव पालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले. अवघ्या तासाभरात एटीएस व बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरु केले. अखेर ही अफवा असल्याचे समोर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच परिसरात चर्चा सुरु झाल्या. आमदार राजू आवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. संस्थेचे कार्यवाह अभिजीत गायकवाड घटनास्थळी होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस