शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: म्हैस बिथरली, थेट घराच्या टेरेसवर गेली; आठवडी बाजारात उडाली एकच धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:49 IST

सोलर पॅनल तसेच फुलांच्या कुंड्यांची मोडतोड

मुरगूड : मुरगूड येथील आठवडी बाजारासाठी आणण्यात आलेली एक म्हैस अचानक बिथरल्याने बाजारपेठेत काही काळ एकच धांदल उडाली. बिथरलेली म्हैस बाजारपेठेतील नामदेव भाट यांच्या बोळातून धावत जाऊन थेट पायऱ्या चढत सुहास चौगुले यांच्या घराच्या टेरेसवर पोहोचली. यात सोलर पॅनल तसेच फुलांच्या कुंड्यांची मोडतोड झाली. आठवडी बाजार असल्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती. याघटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही म्हैस तेजस मोरे यांच्या मालकीची असल्याचे समजते. दरम्यान, म्हैस टेरेसवर गेल्याची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संतोष सोनुले या धाडसी तरुणाने पुढाकार घेत म्हशीला शांत करण्याचे धाडस केले. त्याला सतीश साळोखे, तेजस सोनुले, सोमनाथ यरनाळकर, आकाश भाट आणि राहुल पाटील या तरुणांनीही मदत केली.या सर्वांनी मोठ्या प्रयत्नांनंतर बिथरलेल्या म्हशीला शांत करत सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. त्यांच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Buffalo panics, climbs house terrace; chaos in Kolhapur market.

Web Summary : A panicked buffalo caused chaos in Murugud's market, running onto a house terrace and damaging property. Brave locals calmed the animal and brought it down safely, averting potential disaster. Their courage was widely praised.