शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर लावला लग्नाचा बायोडेटा, नवरदेवाची अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:58 IST

गारगोटी : लग्नासाठी वधू मिळत नसल्याने एका इच्छुक वराने आपला बायोडेटा (वैयक्तिक माहिती) रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर लावला ...

गारगोटी : लग्नासाठी वधू मिळत नसल्याने एका इच्छुक वराने आपला बायोडेटा (वैयक्तिक माहिती) रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर लावला आहे. एजंटांची अवाच्या सव्वा फी ऐकून त्याने ही अनोखी शक्कल लढविली आहे. मुलींच्या घटलेल्या संख्येने आता उग्र रूप धारण केले आहे. परिणामी, उपवर तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. मुलींचे प्रमाण वाढविणे काळाची गरज आहे. अन्यथा सामाजिक समतोल बिघडून अनेकांना विनालग्नाचे राहावे लागणार आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्यासाठी एखादे प्रभावी अभियान सुरू करावे. जेणेकरून तो मैलाचा दगड ठरावा!

सध्याच्या कालखंडात लग्न ठरविणे अवघड काम झाले आहे. अनेक वधू-वर सूचक मंडळांना बायोडेटा पाठवूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच एका इच्छुक नवरदेवाने चक्क रस्त्यात शहरांचे अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर ठिकठिकाणी स्वतःचा बायोडेटा लावला आहे. त्यामुळे लग्न जुळण्यासाठी नामी शक्कल लढविणाऱ्या इच्छुक नवरदेवाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

उच्चशिक्षित, नोकरदार, त्याची कौटुंबिक परिस्थिती चांगली असतानाही त्याला लग्न ठरविताना चांगलीच कसरत करावी लागते. लग्न जुळविण्यासाठी तो वधू-वर सूचक मंडळात अनेक चकरा मारतो. सोशल मीडियावरील अनेक संकेतस्थळांवर आपला बायोडेटा पाठवून बरेच दिवस त्या संकेतस्थळावरून प्रतिसाद येईल काय याची वाट पाहत असतो. या सगळ्या गोष्टी करूनही लग्न जुळत नसल्याने अनेक जण लग्नाच्या विवंचनेत आहेत.

एका इच्छुक नवरदेवाने चक्क गारगोटी कोल्हापूर रस्त्यावरील कूर या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या दगडावरच आपल्या संपूर्ण माहितीचा बायोडेटा चिकटवला आहे. त्यामध्ये पुणे येथील कंपनीत इंजिनीअर म्हणून कार्यरत, वार्षिक पगार ८ लाखांचा, पुणे येथे टू-बीएचके फ्लॅट, वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आणि ‘वधू’संबंधीच्या अपेक्षा या सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. शिवाय संपर्कासाठी आपला मोबाइल नंबरही दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न