शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात फुटपाथवर आढळला रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह, घातपात की अपघात?; तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:08 IST

कोल्हापूर : आपटेनगर चौकातील फुटपाथवर गुरुवारी सायंकाळी प्रकाश जयवंतराव दळवी (वय ४५, रा. सासणेनगर, संभाजीनगर, कोल्हापूर ) यांचा रक्तबंबाळ ...

कोल्हापूर : आपटेनगर चौकातील फुटपाथवर गुरुवारी सायंकाळी प्रकाश जयवंतराव दळवी (वय ४५, रा. सासणेनगर, संभाजीनगर, कोल्हापूर) यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने, रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सीपीआरमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्याकडील दुचाकी आणि मोबाइल चोरीस गेल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा घातपात झाला, की अपघातामुळे त्यांचा मृत्यू असा प्रश्न उपस्थित होत आहे.नवीन वाशी नाका म्हणजेच आपटेनगर चौकाजवळच्या फुटपाथवर गुरुवारी (दि. ३) सायंकाळी प्रकाश दळवी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळला. स्थानिक व्यावसायिकांनी करवीर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.

बुधवारी सायंकाळी कामावरून आल्यानंतर काही वेळाने त्याने आई लक्ष्मीबाई दळवी आणि भाऊ संदीप दळवी या दोघांना बाहेर फिरायला जातो, असे सांगून दुचाकी ते निघाले. बुधवारी रात्री ते घरी परतले नव्हते. त्यांचा भाऊ संदीप दळवी हे जुना राजवाडा पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाले होते. दरम्यान, करवीर पोलिसांनी त्यांना संपर्क केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूचा तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस