शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजरा-गांधीनगर रस्त्यावर १५० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:58 IST

सदाशिव मोरे  आजरा : आजरा - गांधीनगर रस्त्यावरील १५० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला आहे. मुसळधार पडणारा पाऊस व जोरदार सुटलेला ...

सदाशिव मोरे आजरा : आजरा - गांधीनगर रस्त्यावरील १५० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला आहे. मुसळधार पडणारा पाऊस व जोरदार सुटलेला वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे रस्त्यावरून उन्मळून पडली आहेत. महाकाय वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चित्री प्रकल्पासह एरंडोळ, पोळगाव, लाटगाव, खानापूर, विटे, देऊळवाडी या मार्गावरील वाहतूक आजरा शहरातून वळविली आहे. वटवृक्ष कोसळला त्याच्या शेजारीच घर आहे. मात्र वटवृक्ष बाजूला कोसळल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.चित्रीसह सर्वच धरणे तुडुंब आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री मध्यम प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरला आहे. चित्री धरणात १६८६ द.ल.घ.फू. पाणीसाठा झाला आहे. सांडव्यावरुन ४०० क्युसेक्सने तर चित्री धरणाच्या गेटमधून विद्युतगृहासाठी १८० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. पाण्यावर दररोज दोन मेगावॅट विद्युत निर्मिती होत आहे. यापूर्वी आंबेओहोळ, सर्फनाला, एरंडोळ, धनगरवाडी, खानापूर हे लघु पाटबंधारे प्रकल्पही पूर्ण भरले आहेत. उचंगी धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने हिरण्यकेशी नदीला महापूर आला आहे. अद्यापही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने हिरण्यकेशी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर चित्री धरणासह अन्य धरणांवर पर्यटनाला जाण्यास बंदी घातली आहे. धरणे भरल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. चित्री धरणासह सर्वच धरणे गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ दिवस अगोदरच भरली आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस