कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ९ हजार ३५० बॅलेट युनिट व ४ हजार ६७० कंट्रोल युनिटचे वाटप सोमवारी तालुक्यांना झाले. रमणमळा येथील गोदामातून सर्व तालुक्यांना हे मशीन पाठविण्यात आले.जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान व ७ फेब्रुवारीला मतमोजणी होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्याअंतर्गत सोमवारी तालुक्यांना बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटचे वाटप करण्यात आले.
वाचा: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर निवडणुकीच्या प्रशासकीय कामाचे संनियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातून केले जात असून उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी हे याचे समन्वय करत आहेत. जसजसे मतदानाचा दिवस जवळ येईल तसे हालचालीनाही वेग येणार आहे.
राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची तपासणीकोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी वेळेत पूर्ण करणे, स्ट्राँग रूम उघडणे व बंद करणे, त्यांची वाहतूक यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडली जाईल. कुठेही मतदान प्रक्रिया खंडित न होण्यासाठी मॉक पोल व आवश्यक तपासण्या केल्या जातील. राजकीय पक्षांनीदेखील आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवडणूक निरीक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, उमेदवारांसाठी सुलभ परवाने उपलब्ध होण्यासाठी १२ ठिकाणी एक खिडकी योजना सुरू असेल. सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा असतील. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २३ व २४ जानेवारी रोजी तर दुसरे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी होईल. उपजिल्हाधिकारी डॉ. खिलारी यांनी आचारसंहिता, परवान्यांच्या प्रक्रिया, प्रचार कालावधी याची माहिती दिली.
तालुका : कंट्रोल युनिट : बॅलेट युनिट
- करवीर : ७३० : १४६०
- शाहुवाडी : ३७० : ७४०
- हातकणंगले : ६३० : १२६०
- गगनबावडा : ९० : १८०
- राधानगरी : ३९० : ७८०
- आजरा : २२० : ४४०
- पन्हाळा : ३८० : ८९०
- कागल : ४१० : ६७०
- शिरोळ : ४१० : ८२०
- भुदरगड : ३२० : ६४०
- गडहिंग्लज : ३५० : ७३०
- चंदगड : ३७० : ७४०
- एकूण : ४ हजार ६७० : ९ हजार ३५०
Web Summary : 9,350 ballot units and 4,670 control units were distributed to Kolhapur's talukas for the upcoming Zilla Parishad and Panchayat Samiti elections on February 5th. The vote counting will be held on February 7th. The district administration is overseeing preparations.
Web Summary : कोल्हापुर में आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए 9,350 बैलेट यूनिट और 4,670 कंट्रोल यूनिट तालुकाओं को वितरित किए गए। मतदान 5 फरवरी को होगा, और मतगणना 7 फरवरी को होगी। जिला प्रशासन तैयारियों की निगरानी कर रहा है।