मतदार याद्यांसाठी ८ आॅक्टोबरला विशेष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 18:23 IST2017-10-05T18:23:17+5:302017-10-05T18:23:40+5:30
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमात ३ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून दिनांक ८ आॅक्टोबर २0१७ रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले आहे.

मतदार याद्यांसाठी ८ आॅक्टोबरला विशेष मोहिम
कोल्हापूर दि. ५ : निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. ३ आॅक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमात ३ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून दिनांक ८ आॅक्टोबर २0१७ रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले आहे.
दिनांक ३ नोव्हेंबर २0१७ पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन करुन ८ आॅक्टोबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले. ते म्हणाले, नमुना क्र. ६- रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा पुराव्यासह आपल्या मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिेकारी फॉर्म स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त जिल्हा दौºयावर
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनांक १0 आॅक्टोबर २0१७ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौºयावर येत आहेत. सकाळी १0 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी व तहसिलदार यांच्यासमवेत ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक होणार असून ते दुपारी २ वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण करणार आहेत.