गडहिंग्लज तालुक्यात ८९ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:17+5:302021-05-12T04:24:17+5:30
गडहिंग्लज तालुक्यात ग्रामीण स्तरावरील कोविड लसीकरणाचे काम ९१ टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील लसीकरण ७८ टक्के झाले आहे. ग्रामीण ...

गडहिंग्लज तालुक्यात ८९ टक्के लसीकरण
गडहिंग्लज तालुक्यात ग्रामीण स्तरावरील कोविड लसीकरणाचे काम ९१ टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील लसीकरण ७८ टक्के झाले आहे. ग्रामीण भागातील ६७,३६५ नागरिकांनी लस घेतली असून शहरात १२,००४ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
तालुक्यात ८९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात ४५ वर्षांवरील ६६,४५२, १८ ते ४४ वयोगटातील ९१३ तर ९,४०० नागरिकांनी लसीचा दुसरा डोस पूर्ण केला आहे. ७३,८७८ इतक्या उद्दिष्टांपैकी ६,५१३ नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही.
गडहिंग्लज शहराचे १५,३५९ इतके उद्दिष्ट असून त्यापैकी १२,००४ इतक्या नागरिकांनी शहरातील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली आहे. अद्याप ३,३५५ नागरिकांना लस देणे बाकी आहे.
ग्रामीण व शहरी भागातील ८९,२३७ इतक्या उद्दिष्टांपैकी ७९,३६९ व्यक्तींनी लस घेतली आहे. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर २० ठिकाणी व्यवस्था केली आहे. शहरात नगरपालिका प्रशासन व उपजिल्हा रूग्णालय तर्फे बॅ. नाथ पै विद्यालय आणि एम. आर. हायस्कूल याठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.