शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बिद्री कारखान्यासाठी ईर्षेने ८९ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 11:42 IST

किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

सरवडे (कोल्हापूर) : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी ईर्षेने व चुरशीने चार तालुक्यांतील १७३ केंद्रांवर ५६ हजार ९१ पैकी ४९ हजार ९४० (८९.०३ टक्के) मतदान झाले. मुरगूड येथे बोगस मतदान होत असल्याची शंका आल्याने ‘गोकुळ’चे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनी रोखले व गोंधळ उडाला. इतर ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ महालक्ष्मी विकास आघाडी व खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे, ए.वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यांच्यात लढत झाली. नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली असून, उद्या, मंगळवारी ‘बिद्री’वर सत्तेचे तोरण कोण बांधणार? याचा फैसला होणार आहे.करवीर, राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्यांतील २१८ गावांचे कार्यक्षेत्र आहे. उत्पादक सभासद ५५ हजार ६५, तर ‘ब’ वर्ग संस्था सभासद १,०२६ असे ५६ हजार ९१ सभासद होते. त्यापैकी ४९ हजार ९४० मतदारांनी हक्क बजावला.कारखान्याच्या २५ जागांसाठी विविध गटांतून रिंगणात असलेल्या ५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान, उद्या, मंगळवारी मुस्कान लॉन येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

वाढलेला टक्का कोणाला धक्का‘बिद्री’च्या मागील निवडणुकीत ८२ टक्के मतदान झाले. तुलनेत या वेळेला मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला टक्का नेमका कोणाला धक्का देणार, हे उद्याच समजणार आहे.

कागल तालुक्यात सर्वाधिक मतदान‘बिद्री’साठी मतदान झालेल्या १७३ केंद्रांपैकी बहुतांशी केंद्रांवर ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. त्यातही कागल तालुक्यात ९०.४७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान ९७.०१ टक्के फराकटेवाडी येथे झाले. त्यापाठोपाठ चौंडाळमध्ये ९६.३३ टक्के, कुरणीमध्ये ९५.७६ टक्के, तर निढोरीमध्ये ९५.१५ टक्के मतदान झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक