शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कोगनोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शांततेत 85 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:42 IST

Grampanchyat Kognoli Karnataka-कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शांततेत पण चुरशीने 85 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये आजपर्यंत सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीला भाजप प्रणित परिवर्तन आघाडीचे आव्हान होते. यावेळी ग्रामविकास आघाडी सत्ता अबाधित ठेवणार की परिवर्तन होणार हे बुधवार दिनांक 30 रोजीच्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.

ठळक मुद्देकोगनोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शांततेत 85 टक्के मतदान बुधवारि 30 रोजी मतमोजणी

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शांततेत पण चुरशीने 85 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये आजपर्यंत सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीला भाजप प्रणित परिवर्तन आघाडीचे आव्हान होते. यावेळी ग्रामविकास आघाडी सत्ता अबाधित ठेवणार की परिवर्तन होणार हे बुधवार दिनांक 30 रोजीच्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.कोगनोळीमध्ये पुरुष ४८८२ व महिला ४५८६ असे एकूण ९४६८ मतदार आहेत. त्यापैकी ४१९४ पुरुष व ३८३९ महिला असे एकूण ८०३३ म्हणजेच शेकडा ८५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत चुरशीने पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ते आपले मताधिक्य वाढावे यासाठी धडपड करताना दिसत होते. मतदानासाठी वारंवार मतदारांशी संपर्क साधत होते. अपंग व वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती.येथील मतदान केंद्रावर निपाणी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा राखीव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक वाय के कश्यपनावर यांनी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी टी नाडकर्णी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी एम भोसले व परशुराम चावर यांनी कामकाज पाहिले.या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या ग्रामविकास आघाडीसाठी माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी बेळगाव जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील तर भाजपप्रणीत परिवर्तन आघाडीसाठी उत्तम पाटील बोरगावकर, बसवप्रसाद जोल्ले यांनी परिश्रम घेतले होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक