ग्रामपंचायतींच्या मतदार यादीवर ८३५ हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:34 IST2020-12-08T12:33:05+5:302020-12-08T12:34:25+5:30

grampanchyat, elecation, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर ८३५ हरकती आल्या आहेत.

835 objections on Gram Panchayat voter list | ग्रामपंचायतींच्या मतदार यादीवर ८३५ हरकती

ग्रामपंचायतींच्या मतदार यादीवर ८३५ हरकती

ठळक मुद्देग्रामपंचायतींच्या मतदार यादीवर ८३५ हरकती७ गावांमधील हरकतींचा समावेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर ८३५ हरकती आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत १ डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तहसीलदार, ग्रामपंचायत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीबाबत हरकती असल्यास त्या सोमवारपर्यंत (दि. ७) सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

मतदार यादीबाबत सोमवारपर्यंत ८३५ हरकती आल्या असून त्यात हालोंडी, मनपाडळे, वाठार तर्फ वडगांव, कबनूर, लाटवडे, खोची, रूई, तिळवणी या गावांमधील हरकतींचा समावेश आहे. या हरकतींचा विचार करून तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 

Web Title: 835 objections on Gram Panchayat voter list