हातकणंगलेतील ८२ संस्था बिनविरोध

By Admin | Updated: December 19, 2014 23:35 IST2014-12-19T21:11:22+5:302014-12-19T23:35:19+5:30

अद्याप ६७७ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

82 bodies of Hathkangala are uncontested | हातकणंगलेतील ८२ संस्था बिनविरोध

हातकणंगलेतील ८२ संस्था बिनविरोध

हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील ‘ड’ वर्गातील ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या, तर ‘क’ वर्गातील ७०४ संस्थांपैकी २७ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. अद्याप ६७७ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मुदत संपलेल्या संस्थांचा कर्मचारी उपलब्धतेनुसार कार्यक्रम ३१ डिसेंबरअखेर टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याची माहिती तालुका उपनिबंधक सुनील सिंगतकर यांनी दिली.
तालुक्यातील ‘ड’ वर्गातील हौसिंग, पाणीपुरवठा, मजूर अशा ९० संस्थांपैकी ८२ संस्थांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. पाच संस्था ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गाकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत, तर एका संस्थेची निवडणूक पूर्ण झाली आहे. ‘ड’ वर्गातील निवडणुकीचा
कार्यक्रम ३० नोव्हेंबरअखेर पूर्ण
झाला आहे. ‘क’ वर्गातील ७०४ पात्र संस्थांपैकी ३१ मार्च २०१३ अखेर
मुदत संपलेल्या १९५ संस्था, तर
३१ आॅक्टोबर २०१४ अखेर मुदत संपलेल्या ५०९ संस्थांचा समावेश आहे. ‘क’ वर्गातील एकूण ७०४ पैकी २७ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. उर्वरित संस्थांचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.
निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार ‘ड’ आणि ‘क’ वर्गातील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ‘ब’ आणि ‘अ’ वर्गातील संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असल्याचे मत उपनिबंधक सुनील सिंगतकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: 82 bodies of Hathkangala are uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.