शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोल्हापूर जिल्ह्यात ८१५ मंडळांनी आवाज मर्यादेचे केले उल्लंघन, गणराया ॲवॉर्ड समारंभात पोलिस अधीक्षकांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:44 IST

पुढील वर्षी सुधारणा करण्याचे आवाहन

कोल्हापूर : वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील ८१५ मंडळांनी गणेशोत्सवात आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याची खंत पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी व्यक्त केली. कायदा सर्वांना सारखाच असल्याने दोषी मंडळांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. बुधवारी (दि. २४) सायंकाळी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या गणराया ॲवॉर्ड समारंभात त्यांनी विजेत्या मंडळांना बक्षिसांचे वितरण केले.अधीक्षक योगेश कुमार यांनी विधायक उपक्रम राबविणा-या मंडळांचे कौतुक केले. विसर्जन मिरवणुकीत रात्री सात ते बारापर्यंत आवाज मर्यादित राहावा आणि गर्दी नियंत्रित राहावी यासाठी पुढील वर्षी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी नियमांचे पालन करून विधायक पद्धतीने पुढील वर्षी गणेशोत्सव साजरा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डांगे गल्ली तरुण मंडळ तोरस्कर चौक (प्रथम), हायकमांडो फ्रेंड्स सर्कल बुधवार पेठ (द्वितीय), जय शिवराय सांस्कृतिक क्रीडा सर्कल तरुण मंडळ लक्षतीर्थ वसाहत (तृतीय), रामानंद महाराज अवधूत मंडळ जुना शुक्रवार पेठ (विभागून तृतीय), रणझुंजार तरुण मंडळ शनिवार पेठ आणि सी वॉर्ड संयुक्त सेवा मंडळ सोमवार पेठ या मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूल गल्ली मंडळ उमा टॉकीज चौक (प्रथम), लेटेस्ट तरुण मंडळ (द्वितिय), नाथागोळे तालिम मंडळ गुलाब गल्ली (तृतीय) आणि प्रिन्स क्लब खासबाग मिरजकर तिकटी या मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्री गणेश पूजा मित्र मंडळ कवडे गल्ली कसबा बावडा (प्रथम), शाहूपुरी युवक मंडळ शाहूपुरी व्यापार पेठ (द्वितीय), व्हिनस तरुण मंडळ व्हिनस कॉर्नर (तृतीय) आणि भारतवीर तरुण मंडळ चौगुले गल्ली कसबा बावडा या मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ सहावी गल्ली (प्रथम), जय शिवराय मित्र मंडळ शिवाजी उद्यमनगर (द्वितीय), लंबोदर तरुण मंडळ चार्ली स्पोर्ट्स क्लब तेरावी गल्ली (तृतीय), विवेकानंद मित्र मंडळ तेरावी गल्ली या मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये डांगे गल्ली तरुण मंडळ तोरस्कर चौक (प्रथम), श्री गणेश पूजा मित्र मंडळ कवडे गल्ली कसबा बावडा (द्वितीय), राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ सहावी गल्ली (तृतीय), लेटेस्ट तरुण मंडळ गुलाब गल्ली (विभागून तृतीय) आणि शाहूपुरी युवक मंडळ शाहूपुरी व्यापार पेठ, जय शिवराय मित्र मंडळ शिवाजी उद्यमनगर, पूल गल्ली मंडळ उमा टाकीत चौक या मंडळांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: 815 Groups Violated Noise Limits During Ganesh Festival

Web Summary : Despite appeals, 815 Kolhapur groups violated noise limits during Ganesh Chaturthi. Police Superintendent Yogesh Kumar expressed disappointment, promising action against violators. He encouraged traditional music next year. Awards were distributed to winning groups promoting positive initiatives and responsible celebrations.